भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना 2027 उपक्रमांतर्गत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी,कर्मचारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, दिनांक १ मे ते १५ मे या कालावधीत अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या स्व-गणना (Self Enumeration) सुविधेचा लाभ घेऊन आपली जनगणना माहिती स्वयंपूर्णपणे नोंदवावी.
सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृपया खालील संकेतस्थळास भेट द्यावी:
https://se.census.gov.inस्व-गणना पूर्ण केल्यास प्रत्यक्ष घरभेटीद्वारे जनगणना कार्य करताना प्रगणकांवरील (विशेषतः शिक्षण विभागातील शिक्षक बांधवांवरील) कामाचा ताण कमी होण्यास मोठी मदत होईल तसेच जनगणना प्रक्रिया अधिक कार्यक्षम, वेगवान व अचूक होण्यास हातभार लागेल.