संशोधन विभाग
१) विभागाची स्थापना:
१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार संशोधन विभागाची स्थापना करण्यात आली.
२) विभागाची पदसंरचना :
अ.क्र. |
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
१ |
विभाग प्रमुख (उपसंचालक) |
१ |
१ |
२ |
उप विभाग प्रमुख (वरिष्ठ अधिव्याख्याता) वर्ग-अ |
१ |
१ |
३ |
अधिव्याख्याता वर्ग- ब |
१ |
१ |
४ |
विषय सहायक वर्ग- क |
१ |
१ |
५ |
लिपिक/DataEntryOper |
१ |
० |
६ |
गट - ४ शिपाई |
१ |
१ |
३) उद्दिष्टे व कार्ये
- राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांचा शोध घेऊन त्यावर आधारित
राज्यस्तरावरून किंवा जिल्हास्तरावरून लघुसंशोधन प्रकल्प हाती घेण्यास
अधिव्याख्याता व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना प्रवृत्त करणे.
- शिक्षकांनी शैक्षणिक समस्या सोडविण्याकरिता कृती संशोधन प्रकल्प हाती
घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण व आवश्यकते मार्गदर्शन करणे.
- राज्यातील शिक्षक ते पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यातील नवोपक्रमशीलतेस
चालना देण्यासाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करणे.
- राज्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उत्कृष्ट नवोपक्रमांचे संकलन करून
त्यांचे सार्वत्रिकीकरण करणे.
- कार्यालयातील इतर विभागातील शैक्षणिक उपक्रमांना संशोधनात्मक सहाय्य
करणे.
- SCERT, महाराष्ट्र अंतर्गत सर्व विभागांचा वार्षिक कार्य अहवाल इंग्रजी व
मराठी भाषेमध्ये छपाई करून प्रसिद्ध करणे.
- राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी आयोजित केलेल्या
विविध शैक्षणिक संशोधनावर आधारित सारांश संकलन करणे.
- शैक्षणिक संशोधन करणाऱ्या घटकांना आवश्यकतेनुसार विविध संशोधन
अहवाल संदर्भासाठी उपलब्ध करून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे.
- NCERT नवी दिल्ली, RIE भोपाळ यांचे मार्फत आयोजित विविध संशोधन
उपक्रमांचे समन्वयन करणे.
- राज्यातील संशोधन प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकारी/शिक्षक
प्रशिक्षक यांचेसाठी NCERT/RIE यांचे मार्फत क्षमता वृद्धी कार्यक्रम
आयोजित करणे.
४) उपक्रमांची यादी
- राज्यातील शिक्षक ते अधिकारी यांचेसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
आयोजन.
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट या कार्यालयाचा वार्षिक
अहवाल निर्मिती.
- RIE भोपाळ मार्फत “राज्य समन्वय समिती बैठक” आयोजन.
- प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी गरजाधिष्ठित ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स
दिक्षा प्रणालीवर आयोजन.
- परिषद स्तरावर शैक्षणिक अभ्यास भेटींचे समन्वयन.
- जिल्हा स्तरावरून प्राप्त मूल्ये व गुणतत्वे व्हिडीओ संकलन व परिक्षण.
- शैक्षणिक तपासणी व शाळा भेट प्रपत्र (Academic Inspection & School Visits format)
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी राज्यस्तरिय प्रशिक्षकांचे
प्रशिक्षण – लोणावळा -२०२४
- NCERT & SCERT Workshop organizing on Capacity Building
Programme on Research Methodology.
- PGI अहवालाचे विश्लेषण.
- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय शिक्षण
परिषद- दि.२२ व २३ मार्च २०२५ चे आयोजन.
- असर अहवाल व PAT निकालांचा तुलनात्मक अभ्यास.
- IB बोर्ड शाळांमधील अभ्यासक्रम,अध्यापनशास्त्र, मूल्यमापन व रचना यांचा
राज्याच्या अनुषंगाने अभ्यास.
- माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववीतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या
गळतीच्या कारणांचा शोध व उपाययोजना (सन २०१८-१९).
- महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील DIKSHA app च्या द्वारे
QR कोड वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास (सन २०१८-१९).
- महाराष्ट्र राज्यातील शाळां मधील तंत्रज्ञान विषयक साधन सुविधांच्या
उपलब्धता व वापर याविषयी च्या सद्य:स्थितीचा अभ्यास (सन २०१९-२०).
- कृतिसंशोधने - शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये प्राथमिक व
माध्यमिक यांचेकडून ५१ कृतीसंशोध्न कार्य पूर्ण करून घेण्यात आले.
५) निर्मित शैक्षणिक साहित्य
८) फोटो गॅलरी
संशोधन विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे फोटो गुगल ड्राईव्ह वर अपलोड करण्यात आले आहे.
ड्राईव्ह लिंक:
https://drive.google.com/drive/folders/1eEMv9vs7rqqr5ZH2Obxlkt1lCKmzLoz8?usp=sharing