आस्थापना विभाग



विभागाची स्थापना :-

महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवा योजना विभागाकडील शासन निर्णय क्रमांक ‘पीटीसी 1084/6895(35/84) माशि 4, दिनांक 31 ऑगस्ट 1984 नुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेची पुणे येथे निर्मिती करण्यात आली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: डाएट-4516/( 4016)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.न. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक
प्रशासन अधिकारी
कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ब
अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट -ब
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर
शिपाई

विभागाचे कामकाज :-

    1. सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे.
    2. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा मंजुर करणे.
    3. सर्व अधिकारी कर्मचारी यांना वार्षिक वेतन वाढ मंजूर करणे.
    4. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे बाबत अथवा पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही करणे.
    5. सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ मंजूर करणे.
    6. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवे विषयक बाबींची पूर्तता करणे उदा.हिंदी /मराठी भाषा परीक्षेतून सवलत देणे, स्थायित्व प्रमाणपत्र देणे, सेवेचे पुनर्विलोकन, वार्षिक कार्य मूल्यमापन अहवाल,परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे.

विभागातील कामे / उपक्रम :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय 2024/प्र. क्र.08/संगणक दिनांक 15 ऑक्टोबर 2024 नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे व अधिनस्त सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण या कार्यालयामध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे.


Initiatives/Affiliations