विभागाचे नाव : अभ्यासक्रम विकसन विभाग
विभागाची स्थापना :-
बदलत्या काळानुसार राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक गरजा विचारात घेऊन बदललेल्या उद्दिष्टांनुसार शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची वेळोवेळी पुनर्रचना करावी लागते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था कार्यरत असून राज्यस्तरावर (SCERT) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही संस्था आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक मुल्ये जपणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करणारी ही संस्था आहे. अभ्याक्रमाची पुनर्रचना व नुतनीकरण याची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये अभ्यासक्रम विकसन विभाग हा सन १९७५-७६ पासून सुरु आहे.
दि.२४ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य स्तरीय संस्थांचे सक्षमीकरण करून पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार या संस्थेकडे इ.१ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. अभ्यासक्रम विकसन ही जबाबदारी पार पडत आहे.
विभागाची पदसंरचना :-
अ.क्र. |
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
१ |
प्राचार्य |
१ |
१ |
२ |
विभाग प्रमुख |
१ |
१ |
३ |
कार्यक्रम अधिकारी |
१ |
१ |
४ |
विषय सहायक |
१ |
१ |
५ |
लिपिक |
१ |
० |
विभागाची उद्दिष्टे व कार्ये :-
- नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती करणे.
- पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे.
- बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देणे.
- शिक्षकांच्या विषय अध्यापनाबाबत शैक्षणिक अर्हता निश्चित करणे.
- विषय योजना व विषय अध्यापनाचा वार्षिक कामकाज कालावधी ठरविणे.
- नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित करणे.
- सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच नवीन ध्येय धोरणानुसार व बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार अध्ययन - अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन प्रक्रिया याबाबत शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
- प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका व घटकसंच विकसित करणे.
- विषययोजना ठरविणे, अभ्यासक्रमामध्ये नवीन विषय अथवा आशस समाविष्ट करणेबाबत शासनास अभिप्राय देणे.
- शालेय शिक्षण स्तरावरील विषय अध्यापनासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता ठरविणेबाबत शासनास अभिप्राय देणे.
- अभ्यासक्रम निर्मितीसाठी आवश्यक ती कार्यवाही (अभ्यासमंडळ स्थापना, अभ्यासमंडळ उद्बोधन कार्यशाळा, अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा इत्यादीचे आयोजन, शासनाशी पत्रव्यवहार करणे.)
- अभ्यासक्रम प्रशिक्षण सहित्य विकसन करणे.
- अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करणे.
- अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनुधावन करणे व निष्कर्षानुसार पुढील प्रशिक्षण कार्यक्रमात उपयुक्त बदल करणे.
- अभ्यासक्रमाबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणेला माहिती देणे , त्यांचे उदबोधन करणे.
- अभ्यासक्रमाशी सुसंगत असणाऱ्या प्रकल्प प्रस्तावांचे परीक्षण करून प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता देणे.
- विविध खाजगी प्रकाशकांकडून विकसित केलेले शैक्षणिक साहित्य (छापील व ई स्वरूपात) यांचे परीक्षण करणे.
- शिक्षणातील नवविचार प्रवाहाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करणे व आवश्यक तेथे अभ्यासक्रमाचे उच्चीकरण करणे तसेच त्याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना उद्बोधन करणे.
उपक्रमांची यादी :-
- राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 - कार्यशाळा (जानेवारी 2024 ते जून 2024)
- पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 - कार्यशाळा (ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024)
- शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 - (डिसेंबर 2024 ते मार्च 2025)
- शालेय शिक्षण (इयत्ता तिसरी ते दहावी) अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा - (डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025)
- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, क्षेत्रीय शिक्षा संस्था, भोपाळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा -शालेय शिक्षण यावर आयोजित कार्यशाळा (04.11.2024 ते 09.11.2024)
- .राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रम (सन 2016-17 ते 2019-20)
निर्मित शैक्षणिक साहित्य :-
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 |
Open |
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 भाषा भाग 1 |
Open |
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 भाषेतर भाग 2 |
Open |
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 शिक्षक मार्गदर्शिका |
Open |
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 प्रशिक्षण घटकसंच |
Open |
फोटो गॅलरी :-
मा. नामदार श्री. दादासाहेब भुसे, मंत्री शालेय शिक्षण आणि शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. पंकज भोईर यांचा 20 ते 24 जानेवारी 2025 रोजी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 राज्यस्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात संवाद
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण यावर आधारित शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विकसन कार्यशाळा (इयत्ता तिसरी ते दहावी) राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये दिनांक 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. संचालक श्री. राहूल रेखावार
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, क्षेत्रीय शिक्षा संस्था, भोपाळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा -शालेय शिक्षण यावर आयोजित 04.11.2024 ते 09.11.2024 या कालावधीत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे.