प्रसार माध्यम विभाग
विभागाची स्थापना
“राज्य शिक्षणशास्त्र संस्था” म्हणून परिषदेची स्थापना १९६४ मध्ये झाली. तेव्हा प्रकाशन विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत होता. या विभागाचे मुख्य कार्य म्हणजे जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती, छपाई व शाळांना वितरण हे होते. त्यामुळे या विभागास “जीवन शिक्षण” असे म्हटले जात होते. शासन निर्णय, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६, एस.सी.ई.आर.टी. आणि डाएट पुनर्रचना, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या संदर्भाने जीवन शिक्षण विभागाचे नाव “प्रसारमाध्यम विभाग” असे ठेवण्यात आले.
जीवन शिक्षण: शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र
१९ व्या शतकात सुरु झालेले शिक्षक, पालक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मार्गदर्शक ठरणारे व शिक्षण आणि शिक्षणासाठीच वाहिलेले महाराष्ट्रातील पहिले मासिक म्हणजे “जीवन शिक्षण”. शिक्षण क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे बघत आलेल्या या मासिकाचे जुने अंक जर आपण चाळले तर १९ व्या शतकापासून शिक्षण प्रत्येक महिन्यागणिक कसे बदलत गेले याची विस्तृत माहिती या अंकांच्या पानापानातून वाचायला मिळते.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "जीवन शिक्षण" मासिकाचे प्रकाशन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेच्या प्रसारमाध्यम विभागामार्फत केले जाते. शासनाचे ध्येय धोरणे व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आणि अपेक्षित शालेय स्तरावरील अंमलबजावणी व परिणाम यांच्यातील दुवा म्हणून हे मासिक कार्यरत आहे. या मासिकाला १६३ वर्षाची गौरवशाली व वैभवशाली परंपरा असून मासिकाची रचना, नाविन्यपूर्णता आणि आकर्षक मांडणी इत्यादी गुणवैशिष्ट्यामुळे राज्यभरातील अधिकारी व शिक्षक वर्गाचे हे आवडते मासिक ठरले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांना देण्यात येणाऱ्या चार टक्के सादिलवार खर्चातून जवळपास ६०,००० शाळांना या मासिकाचे दरमहा मोफत वितरण करण्यात येते. याच सोबत वर्गणीदारांना आणि देणगीदारांना हा अंक पोस्टामार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. सद्यस्थितीमध्ये या मासिकाची वार्षिक वर्गणी ३०० रुपये असून प्रत्येक अंकाची किंमत रुपये ३० इतकी आहे.
ब्रिटिश कालखंडात संस्कृत शिक्षण देणारे कॉलेज १८२१ मध्ये पुणे येथे सुरू केले व पुढे त्याचे शिक्षक प्रशिक्षण केंद्रामध्ये (पुणे कॉलेज) रूपांतर झाले. त्याच कॉलेजने मे १८६१ मध्ये पुना कॉलेज स्कूल पेपर म्हणजेच "पाठशाला पत्रक" हे २४ पृष्ठांचे व २ रु. किंमत असलेले नियतकालिक सुरू केले. पुना नॉर्मल स्कूलचे सुप्रीटेंडंट श्रीकृष्णशास्त्री तळवेकर हे या पत्रिकेचे आद्य संपादक होत. पुढे १८६३ पासून केरो लक्ष्मण छत्रे या संपादकांनी "मराठी शाळा पत्रक" असे त्याचे नाव बदलले. तदनंतर कॉलेजचे प्राचार्य कृष्णशास्त्री चिपळूणकर हे या मासिकाचे संपादक झाले. कालांतराने "मराठी शिक्षक", नंतर "प्राथमिक शिक्षण" आणि १९५६ पासून "जीवन शिक्षण" या नावाने प्रकाशित होत आहे. महात्मा गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेऊन हे नाव देण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असणारी एक प्रमुख शिखर संस्था (Academic Wing) आहे. जीवन शिक्षण हे मासिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्यांवर आधारित आहे. कोविड कालावधीमध्ये सुद्धा हा अंक कोणताही खंड न पडता सुरळीत सुरू होता.
जीवन शिक्षण - विशेष प्राप्ती
जीवन शिक्षण या मासिकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचेकडून मासिकाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि १६१ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरा आणि योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक मा. राजन खान, मा.प्रा. मिलिंद जोशी आणि वि.दा. पिंगळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रकाशन सल्लागार समिती
| अ.क्र. | नाव | पदनाम | समितीमधील पद |
|---|---|---|---|
| १. | श्री. राहूल रेखावार (भा. प्र. से.) | संचालक | अध्यक्ष |
| २. | श्रीम. अनुराधा ओक | सहसंचालक | कार्यकारी संपादक |
| ३. | श्रीम. ज्योती शिंदे | उपसंचालक | सहसंपादक |
| ४. | डॉ. कमलादेवी आवटे | उपसंचालक | सदस्य |
| ५. | श्री. नामदेव शेंडकर | प्राचार्य, डायट, पुणे | सदस्य |
| ६. | श्री. हरीश बोरावके | सहाय्यक संचालक (लेखा) | सदस्य |
| ७. | श्री. सचिन चव्हाण | वरिष्ठ अधिव्याख्याता | सदस्य |
| ८. | श्रीम. अपर्णा शेंडकर | अधीक्षक | सदस्य |
| ९. | श्री. अरुण सांगोलकर | वरिष्ठ अधिव्याख्याता | सदस्य-सचिव तथा संपादक |
संपादन मंडळ
| अ.क्र. | नाव | पदनाम | मंडळातील पद |
|---|---|---|---|
| १. | श्री. श्रीकांत चौगुले | मुख्याध्यापक | सदस्य |
| २. | श्री. सलील वाघमारे | सेवानिवृत अधीक्षक | सदस्य |
| ३. | श्री. अजित राक्षे | शिक्षक | सदस्य |
| ४. | श्री. संजय जगताप | शिक्षक | सदस्य |
विभागाची पदसंरचना
| अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे |
|---|---|---|---|
| १. | उपसंचालक | 01 | 01 |
| २. | वरिष्ठ अधिव्याख्याता | 01 | 01 |
| ३. | अधिव्याख्याता | 01 | 00 |
| ४. | अधीक्षक | 01 | 01 |
| ५. | विषय सहायक | 01 | 00 |
| ६. | लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर | 03 | 02 |
| ७. | कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने | 01 | 00 |
| ८. | वर्ग ४ | 01 | 00 |
| एकूण | 10 | 05 | |
महत्त्वाचे शासन निर्णय
| अ. क्र. | तपशील | शासन निर्णय |
|---|---|---|
| 1. | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: डायट ४५१६/(४०/१६)/ प्रशिक्षण दिनांक : १७ ऑक्टोंबर, २०१६ |
| 2. | ई-निविदा | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: भांखस-२०१४/प्र.क्र.८२/ भाग-III/उद्योग-४ दिनांक: ६ डिसेंबर, २०१६ |
| 3. | जीवन शिक्षण मासिकाची वार्षिक वर्गणी वाढ करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१२५/ प्रशिक्षण दिनांक: १० डिसेंबर २०१८ |
| 4. | शैक्षणिक पुस्तके, साहित्य, ई-साहित्य, लघुचित्रपट, चित्रपट परीक्षण करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२५/ प्रशिक्षण दिनांक: ५ मार्च २०२० |
| 5. | शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: राप्रधो ४२१५/(३८/१५)/ प्रशिक्षण दिनांक: २४ जुलै, २०१७ |
| 6. | महाराष्ट्रातील वाचन चळवळ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.३६०/एसडी-४ दिनांक: २२ नोव्हेंबर, २०२३ |
विभागाची उद्दिष्टे / कार्ये
- जीवन शिक्षण मासिक व इतर प्रकाशनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रे, विचार, कल्पना, संशोधन इ. बाबत माहिती शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यापर्यंत पोहचविणे.
- दैनंदिन अध्यापनातील समस्यांबाबत प्राथमिक शिक्षकांना सहाय्य करून मार्गदर्शन करणे.
- शिक्षक राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्यात सर्वदूर पोहचविणे.
- बदलती शिक्षणाची धोरणे, मूल्यांकन पद्धती, शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम इ. बाबतची माहिती शाळा व शिक्षकांपर्यंत पोहचविणे.
- शिक्षकांना वाचनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- समग्र शिक्षा व PM SHRI अंतर्गत ग्रंथालय पुस्तके विकसित करून ती शाळांना उपलब्ध करून देणे.
- शाळांमधून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
- चित्रपट निर्मात्यांकडून प्राप्त झालेल्या चित्रपटांचे शैक्षणिक दृष्टिकोनातून सूक्ष्म परीक्षण करून अहवाल सादर करणे.
- खाजगी निर्मात्यांकडून निर्मित केलेल्या छापील साहित्य, ई-साहित्य, शैक्षणिक साहित्य संच / पोस्टर्स इ. चे परीक्षण करणे.
- समाज माध्यमांमार्फत शालेय शिक्षण क्षेत्रातील घडामोडी सर्वदूर पोहोचविणे.
शैक्षणिक वर्षनिहाय प्रसारमाध्यम विभागामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम
| अ.क्र. | वर्ष | तपशील |
|---|---|---|
| 1 | २०२१-२२ | जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती, वाचनयात्री, शगून पोर्टलसाठी दस्तऐवजीकरण, Teacher Talk, Parents Talk |
| 2 | २०२२-२३ | जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती, चित्रपट/लघुचित्रपट तपासणी, ई-साहित्य/छापील साहित्य परीक्षण |
| 3 | २०२३-२४ | जीवन शिक्षण मासिक, महाराष्ट्रातील वाचन चळवळ, समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय पुस्तके (एकूण १२६), १२ चित्रपट परीक्षण, १०९ पुस्तक परीक्षण |
| 4 | २०२४-२५ | जीवन शिक्षण मासिक, समग्र शिक्षा अंतर्गत १७५ पुस्तके, PMSHRI अंतर्गत ५५ पुस्तके, चित्रपट/साहित्य परीक्षण, सोशल मीडियाचा प्रभावी वापर |
शैक्षणिक साहित्य / मासिके / पुस्तके
| अ.क्र. | वर्ष | तपशील | डाउनलोड |
|---|---|---|---|
| १. | २०२१-२२ | जीवन शिक्षण मासिक | |
| २. | २०२२-२३ | जीवन शिक्षण मासिक | |
| ३. | २०२३-२४ | जीवन शिक्षण मासिक, वाचन चळवळ पुस्तिका, समग्र शिक्षा ग्रंथालय पुस्तके | |
| ४. | २०२४-२५ | जीवन शिक्षण मासिक, समग्र शिक्षा व PMSHRI अंतर्गत ग्रंथालय पुस्तके |
विभागाची परिपत्रके
| १ | पत्र | उघडा (Open) |
| २ | परिपत्रक | उघडा (Open) |
फोटो गॅलरी
वाचनयात्री (2021-22)


शगून पोर्टलसाठी सर्वोत्तम शैक्षणिक उपक्रम (2021-22)

Teacher Talk (2021-22)

जीवन शिक्षण - विशेष प्राप्ती (२०२२-२३)




जीवन शिक्षण विशेषांक (२०२२-२३)





जीवन शिक्षण विशेषांक (२०२३-२४)




महाराष्ट्रातील वाचन चळवळ (२०२३-२४)

समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम (२०२३-२४)

जीवन शिक्षण विशेषांक (२०२४-२५)



आमची प्रकाशने









समग्र शिक्षा व PMSHRI अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची छाननी व निवड कार्यशाळा (२०२४-२५)




प्रकाशन सोहळा (दि.१२ मार्च २०२५)


राज्यस्तरीय हकेथोन स्पर्धा प्रसंगी प्रसारमाध्यम विभागाचा स्टॉल

सोशल मीडिया उपस्थिती




उपयुक्त वेबसाईट्स
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे: https://books.ebalbharati.in/archives/
- राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT): https://www.nbtindia.gov.in/
- प्रकाशन विभाग, भारत सरकार: https://www.publicationsdivision.nic.in/index.php?route=product/category&path=188



