बालशिक्षण विभाग:
शासन निर्णय १७ ऑक्टोबर, २०१६ नुसार शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना होऊन परिषदेमध्ये 'बालशिक्षण विभाग' स्थापन झाला. सदर विभागासाठी एक उपसंचालक, एक वर्ग-एक अधिकारी, दोन वर्ग-दोन अधिकारी आणि एक शिपाई अशा पदांची निर्मिती करण्यात आली.
बालशिक्षण विभागाची उद्दिष्टे
- राज्याच्या गरजा लक्षात घेऊन, राष्ट्रीय स्तरावरून निश्चित केल्या गेलेल्या पायाभूत स्तराच्या अभ्यासक्रमानुसार आराखडा निश्चित करणे
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालशिक्षणासंदर्भात दिलेली उद्दिष्टे पूर्ण करणे
- 'स्टार' प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण घटक संच तयार करणे.
- NEP-२०२० नुसार, पूर्वप्राथमिक शिक्षणांतर्गत बालकांची शाळापूर्व तयारी करणे.
- अंगणवाडी सेविकांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालशिक्षणाच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे.
- राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या वयोगटातील सर्व बालकांचा शारीरिक, मानसिक व भावनिक, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने,राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरून कार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे.
विभाग रचना
संचालक
सहसंचालक
उपसंचालक / विभागप्रमुख
उपविभागप्रमुख /
अधिव्याख्याता
अधिकारी कर्मचारी माहिती:
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
उपसंचालक |
१ |
१ |
गट - अ |
१ |
१ |
गट - ब |
२ |
१ |
गट - ब (अधीक्षक ) |
९ |
रिक्त |
लिपिक/Data Entry Oper |
२ |
रिक्त |
गट - क |
० |
१ |
CSR च्या मदतीने शासनाबाहेरील |
० |
रिक्त |
गट - ४ शिपाई |
१ |
१ |
विभागामार्फत सुरु असलेले उपक्रम
सन २०२४ - २०२५
- आनंदी बालशिक्षण प्रशिक्षण ( SCF , FS , TBP व जादुई पिटारा यावर आधारित )
- शाळापूर्व तयारी अभियान
- राज्य अभ्यासक्रम आराखडा : पायाभूत स्तर
- अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र कोर्स (६ महिने) - आंमलबजावणी
- अंगणवाडी सेविकांसाठी हस्तपुस्तिका विकसन
- अंगणवाडी सेविका पदविका कोर्स (१ वर्ष) - विकसन
फोटोगॅलरी :
1. उपक्रमाचेनाव - शाळापूर्व तयारी अभियान सन २०२३-२४
२. उपक्रमाचे नाव- राज्य अभ्यासक्रम आराखडा:पायाभूत स्तर
३. उपक्रमाचे नाव -अंगणवाडी सेविकांसाठी - आंनदी बालशिक्षण प्रशिक्षण
४. उपक्रमाचे नाव :- अंगणवाडी सेविकांसाठी सहा महिन्यांच्या सेवांतर्गत कोर्सची निर्मिती
मोड्यूल लेखन सहभागी तज्ञांची तांत्रिक टीमकडून व्हिडीओशुटींग पूर्ततेनंतर
|
>
 |
परिषदेतील IT विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले.
|
एक वर्ष पदविका कोर्स विकसन
|