शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर 1963 नुसार राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी जानेवारी १९६४ मध्ये राज्य शिक्षणशास्त्र संस्थेची स्थापना करण्यात आली. शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 1984 नुसार राज्यस्तरावर काम करणाऱ्या विविध शासकीय शिक्षण संस्था व राज्य शिक्षणशास्त्र संस्था यांचे एकत्रीकरण करून 1984 मध्ये राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे नामकरण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे असे करण्यात आले. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 29 नुसार शासन निर्णय दिनांक 17 ऑक्टोबर 2016 द्वारे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेस“विद्या प्राधिकरण” म्हणून घोषित करण्यात आले.
शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट 2017 नुसार विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे या नावामध्ये बदल करून महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर शासन निर्णय दिनांक १ जून 2018 नुसार महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे चे नामकरण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे असे करण्यात आले.
शासन निर्णय दिनांक 31 नोव्हेंबर 2019 नुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेचे नामकरण बदलून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व इंग्रजी भाषेतState Council for Educational Research and training Maharashtra असे करण्यात आले आहे..