विभागाचे नाव :- संकीर्ण
                    
                    
                     विभागाची स्थापना :-
                    शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-डायट :45 16/( 40 16)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली असून राज्यस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनर्रचना करून संकीर्ण विभागाची स्थापना करण्यात आली.
                    विभागाची संरचना / पदसंरचना :-
                    
                        
                            
                                | अ. न. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे | 
                        
                        
                            
                                | 1 | प्राचार्य/उपसंचालक | 1 | 1 | 
                            
                                | 2 | प्रशासन अधिकारी /वरिष्ठ अधिव्याख्याता | 1 | 1 | 
                            
                                | 3 | अधीक्षक / अधिव्याख्याता | 1 | 1 | 
                            
                                | 4 | विषय सहाय्यक | 1 | 1 | 
                            
                                | 5 | लिपिक डाटा एंट्री ऑपरेटर | 1 | - | 
                            
                                | 6 | कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएस आर च्या मदतीने | - | - | 
                            
                                | 7 | शिपाई | 1 | 1 | 
                            
                                | एकूण | 6 | 5 | 
                        
                    
                    विभागाची उद्दिष्टे :-
                    
                        -  मासिक व वार्षिक माहिती अधिकार अहवाल संकलन करणे व एकत्रित अहवाल मा. शासकीय व
                            मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना पाठविणे. 
-  संकीर्ण स्वरुपाच्या पत्रव्यवहाराचा निपटारा करणे. 
-  विधान मंडळाचे हिवाळी,पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत तारांकित, अतारांकित
                            प्रश्ने, लक्षवेधी सूचना, ठराव, यांच्या उत्तराचा अहवाल पूरक टिपणीसह नियमितपणे शासनास
                            पाठविण्यासाठी विभागांना निर्देशित करणे . तसेच अधिवेशन कालावधीत परिषदेतील अधिकारी व
                            कर्मचारी यांचे वेळापत्रक नेमून देणे व त्याप्रमाणे उपस्थिती घेणे. 
-  परिषदेतील नागरिकांची सनद अद्यावत करणे व प्रदर्शित करणे. 
-  माहिती अधिकारांतर्गत परिषदेतील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची
                            यादी अद्यावत करून घोषित करणे. 
-  राज्यस्तरीय विषय शिक्षक संघटनेला अनुदान वितरण व कार्यवाही करणे. तसेच त्यांची वार्षिक
                            बैठक आयोजित करणे. 
-  परिषदेमध्ये राष्ट्रीय सण ,राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन करणे. 
-  ATR (Action Taking Report) मा.आयुक्त कार्यालय तसेच शासनास पाठविणे. 
- विविध बैठकींबाबतची माहिती परिषदेतील सर्व संबंधित विभागांकडून संकलित करून
                            एकत्रितरीत्या वरिष्ठ कार्यालयास पाठविणे. 
 विभागातील कामे / उपक्रम:
                    
                        
                            
                                | अ.न. | उपक्रम | उपक्रमाचा तपशील | सुरु असलेली कार्यवाही | 
                        
                        
                            
                                | १ | माहिती अधिकार | माहिती अधिकार मासिक अहवाल तसेच वार्षिक अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवणे. | सर्व विभागांकडून माहिती संकलन. | 
                            
                                | २ | जयंती/पुण्यतिथी राष्ट्रीय सण ,सेवापूर्ती कार्यक्रम | जयंती, पुण्यतिथी तसेच परिषदेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे निवृत्ती समारंभ साजरा करणे. तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण नियोजित करून साजरे करणे. | शासन प्राप्त यादीनुसार जयंती, पुण्यतिथी साजरे करणे व त्या अनुषंगाने तयारी करणे. | 
                            
                                | 3 | लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद प्रश्न/ ठराव/सूचना हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन | तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, ठराव यासंदर्भातील परिषदेतील विविध विभागाकडून एकत्रित करून एकत्रित अहवाल अधिवेशन काळात शासनास पाठवणे. तसेच अधिवेशन काळात कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाची जबाबदारी देणे. | विभागांकडून सर्व प्रश्नांचे संकलन | 
                            
                                | ४ | ATR अहवाल | मा.मंत्री, मा.सचिव यांच्या बैठकीसाठी परिषदेशी संबंधित विषयाची माहिती विविध विभागाकडून एकत्र करून वरिष्ठ कार्यालयास पाठवणे. | विभागांकडून विषयनिहाय माहितीचे संकलन करणे. | 
                            
                                | ५ | शिक्षक संघटना | शिक्षक संघटनांना प्रत्येकी २०,०००/- रुपये अनुदान उपलब्ध होण्यासाठी मा. शिक्षण आयुक्तालय यांच्याकडे अनुदानाची मागणी करणे व अनुदान उपलब्ध करून देणे - अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच संघटनांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अनुदानाचा उपयोग कशा पद्धतीने केला याची माहिती घेण्यासाठी एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करणे. | अनुदान प्राप्तीसाठी पाठपुरावा करणे. | 
                            
                                | ६ | नागरिकांची सनद | परिषदेतील विभागनिहाय नागरिकांची सनद यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे. तसेच सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आपापली सनद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबतचे आदेश देणे. | कार्यवाही पूर्ण | 
                            
                                | ७ | माहिती अधिकार | विभाग निहाय जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे. | कार्यवाही पूर्ण | 
                            
                                | ८ | संकीर्ण पत्रे | संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे. | संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार. | 
                            
                                | ९ | आर्थिक नस्ती | सर्व उपक्रम/प्रशिक्षणे यासंदर्भातील आर्थिक नस्ती तयार करणे. | आर्थिक नस्ती तयार करून मंजूरीकरीता सादर करणे. | 
                        
                    
                    
                     फोटोगॅलरी :-