Support Desk : 020-2447 6938

Innovation Bank

Submit your innovative projects here.

Submit Application

Innovation Competition

Participate in our Innovative Project Competition.

Participate

नवोपक्रम स्पर्धा(सन २०१७-१८)

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे मार्फत सन २०१७-१८ या वर्षासाठी राज्यातील (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व जेष्ठ अधिव्याख्याता या पर्यवेक्षकीय अधिकारी तसेच डी.इएल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य, यांच्यासाठी ) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
शासन निर्णय दि. २२/०६/२०१५ नुसार राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसत आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण मार्फत सन २०१७-१८ या वर्षासाठी नवोपक्रम स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. संशोधनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संशोधन विभाग महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे